News18 Lokmat

आता विधानसभेची निवडणूक सोपी नाही -आठवले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2014 06:13 PM IST

ramdas athavale on joshi16 सप्टेंबर : आज लागेल्या पोटनिवडणुकीचा निकाल लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जर ही निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर महायुती टिकली पाहिजे असा सल्ला रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिलाय.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपचे सत्ता स्थापन केली. मात्र आज पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असता गुजरात वगळता मोदी लाट ओसरली असल्याचं दिसून येत आहे. राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असले तरीही महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन युतीत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न रखडलाय. आजचा निकाल पाहून महायुतीचा घटक पक्ष रिपाइंने भाजप आणि शिवसेनेला समजदारीचा सल्ला दिलाय. पोटनिवडणुकीचे निकाल बघता, राज्यातली निवडणूक सोपी राहिलेली नाही. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड द्यायचा असेल तर शिवसेना आणि भाजपने एकत्र लढलं पाहिजे, असा सल्ला आठवलेंनी दिला. आठवले यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...