News18 Lokmat

मुंबईत प्रसिद्ध दिग्दर्शकाची निर्घृण हत्या, मृतदेह बेडशीटमध्ये बांधून खाडीत फेकला

प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी (वय-37) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 02:48 PM IST

मुंबईत प्रसिद्ध दिग्दर्शकाची निर्घृण हत्या, मृतदेह बेडशीटमध्ये बांधून खाडीत फेकला

मुंबई, 12 ऑगस्ट- प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी (वय-37) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद फुरकान ( वय-38, रा. मालाड) असे आरोपीचे नाव आहे.

क्रिशनेंदू चौधरी हे मुंबईतील गोरेगाव भागात राहत होते. ते लग्न, फिल्म स्टुडिओ याठिकाणी डेकोरेशनचे डिझाईन करणारे प्रसिद्ध डायरेक्टर होते. गेल्या बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री आठ वाजेपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या एका रुममेटने मालाडमधील मालवणी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, शुक्रवारी (9 ऑगस्ट) त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारमधील खाडीत आढळला होता. क्रिशनेंदू चौधरी हे चित्रपट, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचे डिझाईन तयार करत होते. चौधरी डिझाईन तयार करुन आरोपी मोहम्मद फुरकान याला देत होते. मोहम्मद फुरकान हा सेट उभारण्याचे काम करतो.

(हेही वाचा.. आई-वडील झोपले होते घरात.. 11 महिन्यांच्या चिमुरड्याचा बादलीत पडून मृत्यू)

काय आहे हे प्रकरण?

क्रिशनेनंदू चौधरी आणि आरोपी मोहम्मद फुरकान याच्यात मागील काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होता. क्रिशनेनंदू यांचे 85000 हजार रूपये फुरकानकडे अडकले होते. सात ऑगस्ट रोजी या दोघांची भेट झाली. याच वेळी दोघांचा वाद विकोपाला गेला. आरोपी फुरकान आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून क्रिशनेंदू यांना मालाड पश्चिमेकडील आर्यलँड भागात नेले. तिथे त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांनी ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधून रात्री उशिरा एका कारमध्ये टाकून तो विरार खणीवडे येथील खाडीत फेकून दिला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 3 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी मोहम्मद फुरकान याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

Loading...

VIDEO: 'आधी या पोरांची आई मेली, आता घरात काही राहिलं नाही'; मन सुन्न करणारी आजींची व्यथा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...