पोलीस मारतात म्हणून दोन तरुणांनी लावली अशी शक्कल की, गाडी कुणीच अडवली नाही, पण...

पोलीस मारतात म्हणून दोन तरुणांनी लावली अशी शक्कल की, गाडी कुणीच अडवली नाही, पण...

लॉकडाउनचा काळ आहे आणि विनाकारण बाहेर पडलो की पोलीस अडवतात, मारहाण करतात आणि कारवाई करतात.

  • Share this:

ठाणे, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे.  लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नका, असं सांगून सुद्धा लोकं काही एक ऐकत नाही. बाहेर पडण्यासाठी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी काही महाभाग रोज नवनवीन कारणे शोधतात. असाच एक प्रकार समोर आल्यामुळे पोलीसही हैराण झाले.

मुंबईतील अंधेरी इथं एक खळबळजनक घटना उघडकीस आली.  अंधेरी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गाडीवर महाराष्ट्र 'विधानसभा आमदार' असं स्टीकर असलेली गाडी अडवली आणि वाहन चालकांकडे विचारपुस केली असता पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली.

हेही वाचा -नातं माणुसकीचं! पोलीसाने स्कुटीवरून 860 किमी प्रवास करत वाचवले तरुणाचे प्राण

लॉकडाउनचा काळ आहे आणि विनाकारण बाहेर पडलो की पोलीस अडवतात, मारहाण करतात आणि कारवाई करतात. त्यामुळे या तरुणाने नामी शक्कल लढवत थेट आमदाराची गाडी असल्याचे पोलिसांना भासवण्यासाठी चक्क 'महाराष्ट्र विधानसभा आमदार' असं बनावट स्टीकर लावले होते.

यामुळे या तरुणांनी पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता. मात्र, अंधेरी येथे नाकाबंदी दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांची नजर या गाडीवर पडली आणि त्यांना संशयास्पद वाटल्यामुळे चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला.

हेही वाचा -20 तारखेपासून अतिरिक्त एसटी बसेस सुटणार, ही आहे संपूर्ण यादी!

मोहम्मद आणि असलम शहा या दोन तरुणांनी हा प्रताप केला आहे. या दोघांनी आमदार असल्याचे बनावट स्टीकर गाडीला लावून फिरत असल्याचे त्यांच्या चौकशीत कबूल केलं आहे.

या दोघांवर पोलिसांनी कलम 465,419, 269, 270,188, 170, 171 भादवि सह कलम 51(ब), राष्ट्रीय आपत्ती कायदा सहा कलम 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम  सह कलम ३,४,७ द. स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया अॅक्ट कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 18, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading