खडसेंवर आरोप करणाऱ्या मनिष भंगाळेचा जामीन अर्ज फेटाळला

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेचा जामीन अर्ज मुंबई किला कोर्टाने फेटाळलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 07:52 PM IST

खडसेंवर आरोप करणाऱ्या मनिष भंगाळेचा जामीन अर्ज फेटाळला

विवेक कुलकर्णी, मुंबई

25 एप्रिल : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेचा जामीन अर्ज मुंबई किला कोर्टाने फेटाळलाय.

या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे तसंच हे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे जामीन देता येणार नाही असं कारण देत मुंबई किला कोर्टाने मनीष भंगाळेचा जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे आता मनीष भंगाळेला मुंबई सत्र न्यायालयात जामिनसाठी धाव घ्यावी लागणार आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई क्राईम ब्रांचने मनीष भंगाळेला अटक केली होती. कलम ४१९ कागदपत्री फसवणूक करणे, कलम ४६९ खोट्या कागदपत्रांचा वापर करुन प्रतिष्ठित व्यक्तींची प्रतिमा मलिन करणे, कलम ४६८ बनावट कागदपत्रे तयार करणे, कलम ४७१ बनावट कागदपत्रे खरे असल्याचं भासवणे आणि ६६ ड आयटी एक्ट नुसार मनीष भंगाळेला मुंबई क्राईमब्रांचने अटक केलीये.

मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होती. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी देखील केला होता. मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कोणाला फोन कॉल केले होते याची माहिती जाहीर केली होती. त्यात एक नंबर खडसेंचा होता असा दावा मनिष भंगाळे याने केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...