अटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास

अटक ते जामीन, भुजबळांच्या तुरुंगवारीचा प्रवास

  • Share this:

मुंबई, 04 मे :  महाराष्ट्र सदन आणि गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांना अखेर दोन वर्षांनंतर जामीन मंजूर झालाय. 14 मार्च 2016 रोजी भुजबळांना अटक करण्यात आली होती. आज भुजबळांना जामीन मिळाल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भुजबळांच्या अटक ते जामिनापर्यंतचा घटनाक्रम...

घटनाक्रम

14 मार्च 2018

- सोमवारी सकाळी छगन भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

- 11 वाजेपासून ईडीच्या कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांची गर्दी

- 11.30 वाजता भुजबळ कार्यालयात दाखल

- भुजबळांसोबत आमदार जितेंद्र आव्हाड

- नारेबाजी वाढल्यानं 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

- अकरा तासांच्या चौकशीनंतर रात्री 10.00 वाजता भुजबळांना अटक

- येवला-नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

- शिर्डी-मालेगाव मार्गावर केला रास्तारोको

- नाशिकमधल्या मुंबई चौकात कार्यकर्त्यांनी जाळले टायर

- ईडीचे ऑफिस असलेल्या बॅलार्ड पियर परिसरात जमावबंदी लागू

- रात्री उशिरा धनजंय मुंडे यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक

15 मार्च  2016

- विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेत्यांचं आंदोलन

- छगन भुजबळांना दुपारी सत्र न्यायालयात करणार हजर

- नांदगाव - येवलामध्ये कडकडीत बंद

- छगन भुजबळ यांचा दोन दिवस मुक्काम आता ईडीच्या कोठडीत

- भुजबळ यांना जामीन नाकारला

- मुंबई सेशन्स कोर्टाने त्यांना 2 दिवसांची ईडी कोठडी सुनावली

 17 मार्च 2016

- छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

- आर्थर रोड तुरुंगात रवानगी

18 मार्च 2016

- छगन भुजबळ यांची आर्थर रोड जेलमध्ये

4 मे 2018

- छगन भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

- 5 लाखांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन

First published: May 4, 2018, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading