विजय मल्ल्यासह आयडीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी

विजय मल्ल्यासह आयडीबीआयचे आरोपी अधिकारी यांच्याविरोधात कर्जबुडवण्याच्या प्रकरणात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी केलं आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या कायदेशीर अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 06:01 PM IST

विजय मल्ल्यासह आयडीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी

विवेक कुलकर्णी, मुंबई

05 जुलै :  विशेष पीएमएलए कोर्टाने कर्जबुडव्या विजय मल्ल्यासह आयडीबीआयचे आरोपी अधिकारी यांच्याविरोधात कर्जबुडवण्याच्या प्रकरणात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी केलं आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या कायदेशीर अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

ईडीनं १४ जूनला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यात विजय मल्ल्या, किंगफिशर एअरलाईन्सचे माजी चीफ फायनान्शियल आॅफिसर ए रघुनाथन,  यांच्यासोबतच आयडीबीआयचे माजी व्यवस्थापकीय संचालक ओ व्ही बुंदेलू, बँकेचे माजी अध्यक्ष योगेश अग्रवाल, माजी कार्यकारी संचालक एस के व्ही श्रीनिवासन, माजी एमडी बी के बात्रा यांचा आरोपपत्रात समावेश आहे.

आयडीबीआयनं किंगफिशरला दिलेले ९५० कोटींचं कर्ज हे उद्योगांच्या कायद्याचं उल्लंघन असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. कर्ज देण्याकरता किंगफिशरचा आर्थिक कमकुवतपणा, कर्ज परतफेड करण्याची क्षमता नसणं या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आल्याचं ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आयडीबीआयचे काही अधिकारी आणि विजय मल्ल्या यांच्या संगनमतानं चुकीच्या पद्धतीनं कर्ज दिल्या गेल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

ईडीनं आपल्या आरोपपत्रात किंगफिशरला कसं कर्ज देण्यात आलं याचा खुलासा केला आहे. कंपनीला तीन टप्प्यात कर्ज देण्यात आलं होतं, पहिल्या टप्प्यात १५० कोटी, दुसऱ्या टप्प्यात २०० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ७०० कोटी देण्यात आले होते. यातले १५० कोटी मल्ल्यानं परत केले तर ४१७ कोटी रुपये भारताबाहेर लीजचं भाडं देणं आणि इतर गोष्टींकरता वळते केले. पण ईडीचं म्हणणं आहे की किंगफिशर एअरलाईन्सच्या ब्रँडची किंमतच मुळात चुकीची ठरवण्यात आली होती. मल्ल्याने आपल्या फाॅर्म्युला वन या कंपनीसाठी कर्जातले ५० कोटी रुपये वळवले तर इतर कंपन्यांमध्ये १०० कोटी रुपये वळवले असं ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...