मुंबई, 28 एप्रिल : भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं दोन गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सध्या जामिनावर सुटका झालीये. मात्र, अद्यापही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही.
संभाजी भिडेंना अटक आणि अॅट्रॉसिटी काद्याच्या संरक्षणासाठी आरपीआय आठवले गट 2 मे रोजी मोर्चा काढणार आहे. म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व रामदास आठवले करणार असल्याची माहिती आरपीआयचे नेते अविनाश म्हातेकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas athavle, Sambhaji bhide