फरार मारेकऱ्यांना संघटनांचा पाठिंबा -मुंबई हायकोर्ट

नरेंद्र दाभोलकर आणि काॅम्रेड गोविंद यांच्या हत्या प्रकरणातील फरारी आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांचा शोध आव्हान म्हणून करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं सीबीआय आणि एसआयटीला दिला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2017 01:31 PM IST

फरार मारेकऱ्यांना संघटनांचा पाठिंबा -मुंबई हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, मुंबई,23 ऑगस्ट: नरेंद्र दाभोलकर आणि काॅम्रेड गोविंद यांच्या हत्या प्रकरणातील फरारी आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांचा शोध आव्हान म्हणून करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं सीबीआय आणि एसआयटीला दिला आहे. फरारी आरोपींना संघटनात्मक पाठिंबा असल्याशिवाय ते असू फरार राहू शकत नाहीत असं मतही हायकोर्टानं सुनावणी दरम्यान व्यक्त केलं आहे. फरारी आरोपींची पाळमुळं खणून काढा आणि त्यांना शोधा असं हायकोर्टानं म्हटलं आहे. फरार आरोपी पकडले जात नसतील तर याचा अर्थ सुरक्षा पणाला लागली आहे आणि कोणीही सुरक्षित नाही असंच म्हणावं लागेल हायकोर्टानं म्हटले आहे.

फरारींना फक्त आर्थिक नाही तर इतरही मदत मिळेल त्याचा तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घ्या असं हायकोर्टानं एसआयटी आणि सीबीआय आणि एसआयटीला सांगितले आहे.  दरम्यान दाभोळकर - पानसरे हत्याकांड प्रकरणी एसआयटीचा सीलबंद तपास अहवाल हायकोर्टात सादर केले आहेत. फरारी रेल्वेनं पळून गेले असल्याचा तपासयंत्रणांचा दावा आहे. दोघांचेही मोबाईल नंबर शोधून काढल्याची तपासयंत्रणांनी माहिती अहवालात दिली आहे. तर एनआयएला प्रतिवादी करण्यात यावं अशी  मागणी याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी केली.

तपासयंत्रणांकडून एका कोणाला करी या सगळ्या तपासांसाठी जबाबदार धरण्यात यावं अन्यथा सुनावणी आणि अहवाल येत राहतील पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही असंही नेवगी यांनी युक्तीवादादरम्यान म्हटलं. या प्रकरणाची १४ सप्टेंबरला पुढील सुनावणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...