Home /News /mumbai /

5 महिन्यात सात लाखांपेक्षा जास्त लोकांनी मोडला वाहतुकीचा नियम

5 महिन्यात सात लाखांपेक्षा जास्त लोकांनी मोडला वाहतुकीचा नियम

11 एप्रिल : मुंबईत ठिकठिकाणी सीसीटीव्हीचं जाळं तयार झाल्यानंतर 5 महिन्यात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या सात लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. मुंबईतील सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, समोर आलेला हा आकडा फक्त ई-चलानचा असून हातानं देण्यात येणाऱ्या पावत्यांचा यात समावेश नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ई-चलानातून जमा होणारी दंडाची रक्कम कोट्यावधींमध्ये असून यात वाढ होण्याची शक्यता भारंबे यांनी बोलून दाखवली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंग, वाहन चालवताना फोनवर बोलणे, ट्रीपल सीट, सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगचे नियमांचं उल्लंघन यासह अनेक वाहतूक नियम वाहन चालकांकडून मोडले जातात. त्या विरोधात ही कारवाईदेखील केली जाते.
First published:

Tags: Mumbai, Traffic Rules

पुढील बातम्या