मुंबईत मरीन ड्राइव्हवर सुखोई-30 चा मन वेधून घेणारा VIDEO, सलाम कोविड योध्यांना!

मुंबईत मरीन ड्राइव्हवर सुखोई-30 चा मन वेधून घेणारा VIDEO, सलाम कोविड योध्यांना!

जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या हॉस्पिटलवर वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 03 मे : देशभरातील  कोरोना व्हायरसविरोधात लढा देणाऱ्या योध्यांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आज भारतीय लष्कराकडून विशेष मानवंदना देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या हॉस्पिटलवर वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. देशभरातील डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अनोख्या मानवंदनेचा स्वीकार करत भारतीय सैन्याचे आभार मानले.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे.  त्यामुळेच डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यासाठी आज मुंबईतील केईएम, जेजे हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आणि आयएनएचएस आश्विनी या हॉस्पिटलवर नेव्हीच्या एम आय 17 आणि चेतक हेलिकॉप्टर मधून पुष्प वृष्टी करण्यात आली आहे. तसंच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर वायूदल आपल्या सुखोई 30 या लढाऊ विमानांचं फ्लायपास मार्चिंग केलं.  मरीन ड्राईव्हवर वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी फ्लायपास मार्चिंग करून मानवंदना दिली.

मुंबईतील केईएम, जेजे हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आणि आयएनएचएस आश्विनी या हॉस्पिटलवर जेव्हा पुष्पवृष्टी करण्यात आली तेव्हा डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन जवानांना हात उंचावून आभार व्यक्त केले.

 

तर नवी दिल्लीतील रुग्णालयावरही वायुदलाकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, देशभरात वायुदलाकडून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. केरळमधील हॉस्पिटलवर वायुदलाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तर गोव्यातील कोरोना वॉरियर्सना मानवंदना देण्यासाठी पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय आणि मडगाव येथील ओस्पिसीओ रुग्णालयावर नौदलाच्या विमानाने सकाळी  पुष्पवर्षाव करण्यात आला आहे.

 

तर दुसरीकडे पंचकुला सेक्टर-6मध्ये सैन्य दलाच्या बँड पथकाने शासकीय रुग्णालयाबाहेर सादरीकरण करून डॉक्टरांना मानवंदना दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 3, 2020, 10:20 AM IST
Tags: air india

ताज्या बातम्या