महाराष्ट्र सदन घोटाळा : चमणकरांचं मुख्यमंत्र्यांकडे एफआयआरची चौकशी करण्याची मागणी

महाराष्ट्र सदन घोटाळा : चमणकरांचं मुख्यमंत्र्यांकडे एफआयआरची चौकशी करण्याची मागणी

खोटया कागदपत्रांच्या आधारे ही तक्रार केली असल्याचं चमणकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

  • Share this:

30 एप्रिल : आर्किटेक्ट प्रसन्न चमणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड्णवीस यांना पत्र लिहून दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी एसीबीनं दाखल केलेल्या एफआयआरचीच चौकशी करावी अशी मागणी केली आहे. खोटया कागदपत्रांच्या आधारे ही तक्रार केली असल्याचं आरोप चमणकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

एसीबीनं 11 जून 2015 ला दाखल केलेल्या एफआयआरमध्ये प्रसन्न चमणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ७४९ कोटींचं राज्याच्या तिजोरीला नुकसान झाल्याप्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चमणकर यांनी या प्रकरणी आरटीआयच्या माध्यामातून माहिती काढली  आहे. यात त्यांना राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी तत्कालीन अतिरिक्त सचिव गृह विभाग अमिताभ राजन यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी 11 डिसेंबर 2013 ला दिलेला अहवाल मिळालाय.

या अहवालात एसीबीनं महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला नसून सदनाचं कंत्राट देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत सोयीसुविधा उपसमितीने घेतल्याचं म्हटलं आहे. सदनाच्या प्रकल्पाची किंमत 52 कोटींवरुन 152 कोटी इतकी करण्यात आली होती. त्यावर सदनाची किंमत ही ठरवण्यात आली नव्हती. त्यामुळे याची पुढे चौकशी करण्याची गरज नाही असंही एसीबीनं आपल्या अहवालात म्हटलं होतं.

या प्रकरणी नेमलेल्या आर्किटेक्टनं आपला अहवाल सादर करण्यापूर्वीच एसीबीने आपला अहवाल तयार करून ठेवला होता. आर्किटेक्टचा अहवाल आमच्या विरोधात असेल, असं गृहीत धरुनच एसीबीनं आपला अहवाल तयार केला आणि त्या आधारेच माझ्या आणि माझ्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करण्यात असाल्याचा आरोप चमणकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. या एफआयआरचीच पारदर्शकपणे चौकशी करा, अशी मागणी चमणकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

First published: April 30, 2017, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading