विकासकांना अधिमूल्यात 50 टक्के सूट मंजूर; सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होणार का?

विकासकांना अधिमूल्यात 50 टक्के सूट मंजूर; सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होणार का?

महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज विकासकांना अधिमूल्यामध्ये 50% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला

  • Share this:

मुंबई, 4 मार्च : महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज विकासकांना अधिमूल्यामध्ये 50% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने स्थायी समितीमध्ये  विरोध केला होता. परंतू आज मात्र हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे चार दिवसात काय घडलं, भाजपची विरोधाची भूमिका चार दिवसात का मावळली.

या प्रकरणात भाजपची दुटप्पी भूमिका असून ते सोयींचं राजकारण करतात, अशी भूमिका विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपने मात्र हा संपूर्ण बनाव असल्याचे सांगून महापौरांनी जाणीवपूर्वक आज कोरोनाची लस घेतली आणि घरी राहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महासभा बोलावली. त्यामुळे आम्हाला आमचा विरोध दर्शवता आला नाही, असं मत भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. तर या प्रकरणात मात्र शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर टीका केलेली आहे.

हे ही वाचा-परीक्षा केंद्रावरील हायटेक कॉपी रॅकेट; ब्लुटूथ, टॅबच्या मदतीने सुरू होता प्रकार

भाजप नेहमीच खोटी आकडेवारी देत असतं त्यांनी हीच 'फेकूगिरी' आजही केली आहे. प्रत्यक्षात कुठेही विरोध केला नाही आणि हा प्रस्ताव एकमताने मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या आताच्या विरोधाला काही अर्थ नाही असं मत व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने राज्यभरातल्या प्राधिकरणांना एकूणच बांधकाम व्यवसायाला लागलेली उतरती कळा घालवण्यासाठी आणि विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बांधकाम अधिमूल्य 50 टक्के सूट देण्यात यावी, ही सूट डिसेंबर 2021 पर्यंत दिली जावी अशी शिफारस केली होती. मुंबईत जमिनीची मालकी असणारे मुंबई महापालिका म्हाडा जिल्हाधिकारी असे अनेक प्राधिकरण आहेत. प्राधिकरणाला वेगवेगळे निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाने दिलेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना पन्नास टक्के सूट देऊ नये, त्यामुळे मुंबई महापालिकेचे अडीच हजार कोटीचे नुकसान होईल अशी भाजपची भूमिका आहे. तर राज्य शासनाच्या या शिफारशीला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांची सहमती म्हणूनच भाजपने या निर्णयाला विरोध का केला नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: March 4, 2021, 11:20 PM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या