मेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मान्यता, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मान्यता, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या भरारीनंतर आता मुंबई उपनगरांनाही कवेत घेतलं जाणार आहे.

  • Share this:

24 आॅक्टोबर : मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या भरारीनंतर आता मुंबई उपनगरांनाही कवेत घेतलं जाणार आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मेट्रो 5 आणि मेट्रो 6 च्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आलीये.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मेट्रो 5 आणि मेट्रो 6 ला मंजुरी देण्यात आलीये. मेट्रो 5 ही ठाणे-भिवंडी- कल्याण हे एकूण 24 किलोमीटरचं अंतर असणार आहे. तर मेट्रो 6 च्या प्रकल्पाचं 14.47 किमीचं अंतर असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 6672 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला मागील वर्षी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो 6 आणि मेट्रो 5 च्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळानेही हिरवा कंदील दिलाय.

अशी असेल मेट्रो 5

ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रो

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो 24 कि. मी. लांबीचा

- एकूण 17 स्थानके असणार असतील आणि या

-प्रकल्पाची किंमत 8416 कोटी

असा असेल मार्ग

 कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगांव, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळुकंभ नाका, कापुरबावडी

स्वामी समर्थनगर-विक्रोळी मेट्रो 6

- स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मार्गाची लांबी 14.5 कि.मी.

- मार्गावर 13 स्थानके

- प्रकल्पाची किंमत 6672 कोटी

असा असेल मार्ग

स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, शामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 03:50 PM IST

ताज्या बातम्या