मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्याला मिळाले नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देवाशीष चक्रवर्तींकडे पदभार

राज्याला मिळाले नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देवाशीष चक्रवर्तींकडे पदभार

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 नोव्हेंबर : राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (State Chief Secretary Sitaram Kunte)  यांचा कार्यकाळ अखेर संपला आहे. त्यांच्या जागी आता नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची निवड करण्यात आली आहे. सिताराम कुंटे यांनी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे पदाभार सोपवला आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे त्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. कुंटे यांना सतत मुदतवाढ देण्यात येत असल्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण झाला होता. अखेरीस राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याचं टाळलं. त्यामुळे  नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव असलेले

देबाशिश चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या टीमसोबत शेअर केला PHOTO

चक्रवर्ती यांच्या नियुक्तीबद्दल 1 महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिला होता. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. देबाशिष चक्रवर्ती यांना 3 महिने कार्यकाळ मिळणार आहे.  चक्रवर्ती हे फेब्रुवारी 2022 ला निवृत्त होणार आहे.

Redmi Note 11T भारतातील सर्वात पॉवरफुल 5G फोन, 50MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांना सीबीआयनं समन्स (summoned by the CBI) बजावले होते. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी हा समन्स बजावला होता.   या प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयनं अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीचाच एक भाग म्हणून सीबीआय सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार आहे. पण, कुंटे यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. या प्रकरणी राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरुद्ध राज्य सरकार वाद पेटला आहे.

First published: