मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...तेव्हा काय बोबडी वळली होती का? नाईक कुटुंबाने सोमय्यांना फटकारले

...तेव्हा काय बोबडी वळली होती का? नाईक कुटुंबाने सोमय्यांना फटकारले

'किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे?'

'किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे?'

'किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे?'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 13 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून (anvay naik suicide case) शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) शाब्दिक युद्ध पेटले आहे.  भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांचे आणि अन्वय नाईक कुटुंबासोबत जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देत 'तेव्हा काय बोबडी वळली होती का?' असा सणसणीत टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक (Akshata Naik) यांनी लगावला.

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आज्ञा नाईक आणि अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्यांना चांगलेच फटकारून काढले आहे.

'किरीट सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे, ते बऱ्याच लोकांकडून आता कळले आहे. पण, त्यामध्ये गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती त्यांना दिली. सोमय्या जे सातबारे दाखवत आहे, ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर कुणालाही पाहता येईल. उलट सोमय्यांनी ते जाहीर केले आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो', असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला.

कोरोनामुळे गेली वैमानिकाची नोकरी, गणवेश घालून सुरू केला फूड स्टॉल

तसंच, 'जमीन कुणीही विकत देऊ शकत नाही का? हा संपूर्ण योग्य मार्गाने व्यवहार झाला आहे. मुळात या आरोपांचा अन्वय नाईक यांच्या आत्महत्येशी काय संबंध आहे? नेमकं आताच सोमय्यांना याची आठवण कशी झाली, त्यांना काय दाखवायचं आहे. सोमय्यांनी आणखी मेहनत घेऊन कागदपत्र शोधून काढावी. जर काही मदत लागली तर मला सांगावे, मी मदत करायला येईल, असंही आज्ञा नाईक म्हणाल्या.

'किरीट सोमय्या यांना राजकारण करण्यासाठी काहीही मुद्दे आणू शकता. पण त्यांना आताच हे मुद्दे समोर आणण्यामागे कारण काय आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?' असा थेट सवाल आज्ञा नाईकने सोमय्यांना विचारला आहे.

तसंच, 5 मे 2018 रोजी जेव्हा आम्ही अन्वय नाईक यांना अग्नी दिला होता. तेव्हा किरीट सोमय्या कुठे होते. त्यांची बोबडी वळली होती का? असा संतप्त सवाला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी विचारला आहे.

दिवाळीच्या दिवसांत टाळा 5 चुका, अन्यथा लायसन रद्द होऊ शकतं

'किरीट सोमय्या हे आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर ते जागे झाले. लोकं वस्तू विकत घेतात. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहे. सोमय्यांनी जमीन व्यवहाराचा या प्रकरणाशी संबंध जोडू नये, आता बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही', असा इशाराही अक्षता नाईक यांनी दिला.

किरीट सोमय्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंब आणि नाईक कुटुंबामध्ये 21 जमिनीचे व्यवहार झाले, असा दावा सोमय्यांनी केला होता.

First published: