रश्मी ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहाराचा आरोप, संजय राऊत म्हणाले....

अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 13 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून (Anvay Naik suicide case) भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) वाद पेटला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या ((kirit somaiya) यांनी अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबात जमीन व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. 'अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर व्यवहारावरून आरोप करण्याचे कोणतेही कारण नाही', असा टीका संजय राऊत यांनी केली. तसंच, आता तुम्हाला घरी बसवले आहेच, त्यामुळे आता पुढील 25 वर्ष घरीच बसावे लागणार आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती आणि सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा या प्रकरणावरून गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. 'मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सरकार, विधिमंडळ कधीही पाठीशी घालणार नाही, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी भाजपचे नेते राम कदम यांना सणसणीत टोला लगावला. 'किरीट सोमय्या यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले आहे, त्याचे एक पुस्तक होईल. त्यांनी न्यायालयात जरूर जावावे. मुळात किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, असं रवींद्र वायकर बोलले होते, ते खरंच आहे', अशा शब्दात निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली. 'ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एक महिन्यात म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत सोमय्या यांनी पुरावे द्यावे, जर त्यांनी पुरावे दिले नाही तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी', असं ओपन चॅलेंजच गोऱ्हे यांनी सोमय्यांना दिले. तसंच, गाणं म्हणणे, चेहरा बदलणे, अगोदरचा चेहरा नंतरचा चेहरा आणि वाटेल ती विधानं करणे, असं त्यांना जमलं आहे. पण यात रश्मी ठाकरे कधी पडलेल्या नाहीत, असं म्हणत गोऱ्हे यांनी भाजप नेत्यांना चांगलीच चपराक लगावली.
    Published by:sachin Salve
    First published: