आणखी एक आयएसआय एजंट जावेदला आग्रीपाडामधून अटक

आणखी एक आयएसआय एजंट जावेदला आग्रीपाडामधून अटक

मुंबईतील आग्रीपाडा भागातून जावेदला अटक केली असून जावेद हा आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या थेट संपर्कात होता.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 04 मे : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवादीला सतत खतपाणी घालत असते.  या संस्थेचा आणखी एका आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आलीये. त्याचं नाव आहे जावेद. काल अल्ताफ कुरेशी या आयएसआय एजंटलाही मज्जीद बंदर इथून अटक करण्यात आली होती.

मुंबईतील आग्रीपाडा भागातून जावेदला अटक केली असून जावेद हा आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या थेट संपर्कात होता आणि त्यालाच पाकिस्तानहून आफताब अलीला हेरगिरी करण्याचे पैसे देण्याचे आदेश मिळाले होते.

दोघांनाही आज सेशन कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

First published: May 4, 2017, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading