Home /News /mumbai /

आणखी एक सकारात्मक पाऊल; महाराष्ट्र सरकारने प्लाझ्मा बँकेसाठी निवडलं आणखी एक शहर

आणखी एक सकारात्मक पाऊल; महाराष्ट्र सरकारने प्लाझ्मा बँकेसाठी निवडलं आणखी एक शहर

राज्यात प्लाझ्मा थेरेपीची सकारात्मक परिणाम दिसत येत असल्याने राज्यातील कोरोनातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन केलं जात आहे

    मुंबई, 23 जुलै : महाराष्ट्रातील धारावी आणि मालेगाव येथे एकावेळी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र राज्य सरकारला या भागात कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कौतुक केलं होतं. महाराष्ट्र सरकार प्लाझ्मा थेरेपीमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामामुळे प्रभावित झाली आहे. यासाठी ते आता धारावीनंतर मालेगाव येथे प्लाझ्मा बँक सुरू करणार आहेत. प्लाझ्मा बँकेच्या माध्यमातून सरकारचा हा प्रयत्न आहे की या दोन्ही भागातून जास्तीत जास्त प्लाझ्माचं संकलन केलं जावं. ज्यामुळे गरजुंना प्लाझ्मा थेरेपी दिली जाऊ शकते. हे वाचा-उद्धव ठाकरे यंदा नाही साजरा करणार वाढदिवस, पण शिवसैनिकांना केली विनंती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की सरकार अनेक ठिकाणी प्लाझ्मा बँक सुरू करणार आहे. मात्र प्राथमिक पातळीवर मालेगाव आणि धारावी येथे प्लाझ्मा थेरेपीअंतर्गत अधिकाधिक प्लाझ्माचं संकलन केलं जाईल. सरकार प्लाझ्मा थेरेपीअंतर्गत गंभीर संक्रमित कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. धारावीच्या आमदार आणि महाराष्ट्राच्या शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की – धारावीतील ज्यांच्या शरीरात एन्टीबॉडी तयार झाल्या आहेत त्यांना प्लाझ्मा डोनेट करायला हवा. ज्यामुळे दुसऱ्या रुग्णांचा जीव वाचवता येईल. हे वाचा-5 ऑगस्टला येणार नाही का कोरोना? अयोध्या दौऱ्यावरुन इम्तियाज यांचा मोदींवर निशाणा महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) उद्रेक सुरूच आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 9895 कोरोनारुग्णांचं निदान झालं. कालही दहा हजारांवर नव्या कोरोनारुग्णांचं निदान झालं होतं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. आजही मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 47 502 झाली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या