मुंबई, 29 मार्च : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाच संसर्ग झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Shiv Sena leader Covid-19 positive Wife also infected)
त्यातच हाती आलेल्या बातमीनुसार शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam and his wife Covid -19 Positive) आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांची कोविड-19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीचकँडी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा-एका तासात आवरायचं अन्यथा; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक पोलिसांचा नवा फंडा
राज्यातील कोविड रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे (Lockdown in Maharashtra) अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Covid-19 positive, Mumbai, Shivsena