घोळ सुरूच! मुंबई कांजुरमार्ग कारशेड प्रकरणी आणखी एक नवा वाद समोर

घोळ सुरूच! मुंबई कांजुरमार्ग कारशेड प्रकरणी आणखी एक नवा वाद समोर

Mumbai Metro कोर्टाचा आदेश असताना देखील आपल्याला काहीही न कळवता कारेशेडसाठी जमीनीचं परीक्षण सुरु केल्याबद्दल त्यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.

  • Share this:

मुंबई 11 नोव्हेंबर: पहिल्यापासूनच संकटाची मालिका मागे लागलेल्या मुंबईतल्या कांजुरमार्ग कारशेड (Kanjurmarg metro carshed project) प्रकरणी आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. या जमीनीचे मालक महेश गारोडिया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोर्टाचा आदेश असताना देखील आपल्याला काहीही न कळवता कारेशेडसाठी जमीनीचं परीक्षण सुरु केल्याबद्दल त्यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.

16 एप्रिल 2016 रोजी मुंबई सिटी सिव्हील कोर्टाने गारोडियांच्या जमीनीची लीज रद्द करुन एमएमआरडीएकडे जमीन देण्यासाठी मनाई करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची आठवण गारोडिया यांनी कायदेशीर नोटीसमध्ये करुन दिली आहे. तसंच कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करत एमएमआरडीएने या जमिनीवर आणलेली यंत्रसामुग्री हटवावी असंही या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे.

कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राचीच असून त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.

भाजपला मोठं खिंडार! ठाणे, पालघर जिल्ह्यातील या नेत्यांनी धरला काँग्रेसचा 'हात'

मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. संबंधित जमीन महसूल विभागाची असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पूर्ण केल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली होती.

मेट्रो कारशेडला आरेमधून  कांजूरमार्गला  हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने  (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.  पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.

डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये मजेत अंघोळ करताना केला VIDEO

कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे.  त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

आता त्या जमीनीवर हक्का सांगत जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली गेल्याने नवीनच वाद समोर आला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 2:39 PM IST

ताज्या बातम्या