Home /News /mumbai /

डोंबिवलीतील हळद आणि लग्नाला हजर असलेल्या आणखी एका महिलेला कोरोनाची लागण

डोंबिवलीतील हळद आणि लग्नाला हजर असलेल्या आणखी एका महिलेला कोरोनाची लागण

म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे विवाह समारंभ पार पडला.

डोंबिवली, 29 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. वारंवार सांगूनही लॉकडाऊन लोकांनी गांभीर्यानं घेतलेलं दिसत नसल्यानं पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. डोंबिवलीमध्ये आणखी एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ही महिला डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि पश्चिमेला लग्न समारंभात उपस्थित होती. या घटनेनंतर पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे लॉकडॉऊन केला आहे. कोरोनाच्या भीतीनं महापौर विनिता राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. या लग्न समारंभाला महापौर आपल्या पतीसह उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे या लग्न समारंभातील आणखी किती व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे यासंदर्भात शोध सुरू आहे. मुंबईसह ठाण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. शनिवारपर्यंत 108 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. हेही वाचा..कोरोनाबाधितांवर होणार कॅशलेस उपचार, राज्य सरकारने केली मोठी घोषणा डोंबिवलीतील हळद आणि लग्न प्रकरण नेमकं काय आहे? म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे विवाह समारंभ पार पडला. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना लागण झाली आहे याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही मात्र पोलिसांकडून शोध सुरू आहे. डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना पसरवल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल केले आहे.यात कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केलाच तर लग्न असलेल्यांवर आणि जागामालकावर गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे कोरोना परवलेल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे. हेही वाचा..क्वारंटाइन असताना बाहेर पडलात तर खबरदार, पोलीस दररोज करणार VIDEO CALL
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या