इक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी

इक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी

इक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.

  • Share this:

03 आॅक्टोबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. अंधेरीतील जमीन व्यवहार करताना इक्बाल कासकरनं तीन कोटींची खंडणी उकळल्याचं समोर आलंय.

ठाण्यात एका बिल्डराला खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं इक्बालला अटक केली होती. इक्बालच्या चौकशीत नव नवीन खुलासे होत आहे. आता इक्बालने अंधेरीतील एका सुप्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिली होती. गोराईमध्ये एका जमिनीच्या संदर्भात 3 कोटीची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात ठाणे नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. इक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.

First published: October 3, 2017, 9:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading