Home /News /mumbai /

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर आणखी एकच हल्ला, 'ही' व्यक्ती कोण?

नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर आणखी एकच हल्ला, 'ही' व्यक्ती कोण?

नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे.

नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे.

नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) जामिनीवर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा हल्लाबोल सुरूच आहे. नवाब मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्वीट केला असून ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केल्यामुळे एनसीबी आणि समीर वानखेडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती कोण आहे असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला आहे.  हा फोटो अब्दुल अझीझचा असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल अझीझ याचं नाव हे समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह नाम्यात आहे. तसंच, अब्दुल अझीझ आणि यास्मिन वानखेडे यांचं लग्न झालं होतं. पण त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. या दोघांना एक १० वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सध्या तो इटलीमध्ये आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. नवाब मलिक यांनी याआधीही यास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते.  एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल (Fletcher Patel) कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन (Lady Don) कोण आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला होता. झोपलेल्या वडिलांचा केला खून; म्हणे, अब्बा परेशान होते म्हणून जन्नतला पाठवलं 'फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगतो की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा, असंही मलिक म्हणाले होते. मलिक यांच्या आरोपानंतर यास्मिन वानखेडे समोर आल्या होत्या. मलिक यांनी ज्या लेडी डॉनचा उल्लेख केला होता त्याच यास्मिन वानखेडे असल्याचं सांगितलं जात आहे. त्या मनसेच्या पदाधिकारी आणि वकील आहे. मनसेनं त्यांची पाठराखण केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nawab malik

    पुढील बातम्या