मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /महाराष्ट्र पोलिसांची आणखी एक कामगिरी; पश्चिम बंगालमधील तरुणीला मिळवून दिलं घर

महाराष्ट्र पोलिसांची आणखी एक कामगिरी; पश्चिम बंगालमधील तरुणीला मिळवून दिलं घर

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला होता..

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला होता..

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला होता..

ठाणे, 11 जानेवारी :  घरातून भांडण करुन पश्चिम बंगालहून आलेल्या (West Bengal) एका 27 वर्षीय तरुणीला महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) तिच्या कुटुंबासोबत भेट करुन दिली. एका अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत सांगितलं. पोलिसांच्या गस्ती पथकाने या तरुणीला 26 डिसेंबर 2020 रोजी नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनवर भटकत असताना पाहिलं होतं.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धूमल यांनी सांगितलं की, चौकशी केल्यानंतर तरुणीने सांगितलं की, ती पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील आपलं घर सोडून तीन-चार दिवसांपासून वाशी रेल्वे स्टेशवर राहत आहे. (Another achievement of Maharashtra Police got house for a young woman from West Bengal) तिने सांगितलं की, महिलेने पोलिसांनी काही काळासाठी राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. यानंतर ठाण्यातील महिलेने तिला जेवू घातलं आणि राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिला आश्रम गृहात भरती केलं आणि कुटुंबीयांना सूचना दिली.

हे ही वाचा-धक्कादायक! एक कप कॉफी पडली 50 हजाराला, बँक मॅनेजरसोबत नेमकं काय घडलं वाचा

आश्रमातील प्रमुख तरुणीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. घरात वाद झाल्यानंतर तरुणी घर सोडून निघून आली होती. महिलेच्या कुटुंबीयांनी बारासात पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वाशी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्कात होते. तरुणीला रविवारी त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. (Another achievement of Maharashtra Police I got a house for a young woman from West Bengal) त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलली. आम्हाला आनंद आहे की, पोलीस समाजातील नागरिकांच्या आनंदासाठी काम करीत आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra police, West bangal