मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत, दिवाळी आधी पैसे देणार; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत, दिवाळी आधी पैसे देणार; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना दिवाळी आधी ही मदत पोहोचेल अशी व्यवस्था करू असंही ते म्हाणाले. हे पैसे कसे उभे करायचे त्याचा विचार सुरू असून कर्ज घ्यावं लागलं तर तेही घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई 23 ऑक्टोबर: पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत दिली जाईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारचे निकष आहे त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. हेक्टरला 10 हजार रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे 38 हजार कोटी येणं बाकी आहे. ते पैसे मिळावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिवाळी आधी ही मदत पोहोचेल अशी व्यवस्था करू असंही ते म्हाणाले. हे पैसे कसे उभे करायचे त्याचा विचार सुरू असून कर्ज घ्यावं लागलं तर तेही घेऊ असंही ते म्हणाले.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे.

फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल. एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.

अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे

दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल

पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल.

केंद्र सरकारचं पथक राज्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र अजुनही ते पथक आलेलं नाही असं सांगत त्यांनी केंद्रालाही टोला लगावला. केंद्राने दुजाभाव करू नये असंही त्यांनी सांगितलं.

मला राजकारण करायचं नाही नाही मात्र जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारकडे बोट तर दाखवलं मात्र थेट आरोप करण्याचं टाळलं.  तर शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत ही अतिशय तोकडी आहे आणि सरकारने घोषणा केलेली मदत ही फसवी आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

First published:

Tags: Uddhav thackeray