Maharashtra Lockdown घोषणेआधी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा

Maharashtra Lockdown घोषणेआधी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल रेल्वे गाड्यांची घोषणा

रेल्वे प्रशासनाने योग्य ती पावले उचलत स्पेशल गाड्या सुरू केल्या असल्या तरी प्रवाश्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही.

  • Share this:

सुस्मिता भदाणे पाटील, प्रतिनिधी

मुंबई, 12 एप्रिल :  राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थिती बिकट होत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परप्रांतीयांनी पुन्हा एकदा गावााचा रस्ता निवडला आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून (western railway) स्पेशल गाड्यांची (Special Trains) घोषणा करण्यात आली आहे.

विकेंड लॅाकडाऊननंतर (weekend lockdown) मुंबईतील कामगार वर्ग गावाकडे जायला निघाला आहे. यामुळे अनेक रेल्वे स्थानकांत गर्दी पहायला मिळते आहे.  मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्या काही दिवसांपासून गर्दी पहायला मिळत आहे.  पश्चिम रेल्वे मार्फत लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना पुर्वकाळातील 90 गाड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांची सोय होऊ शकते.

Maharashtra Lock down : लॉकडाऊनची नियमावली ठरली, लोकलबाबत महत्त्वाची माहितीसमोर

अतिरिक्त गर्दी कमीकरण्यासाठी 14  विशेष गाड्या लवकरच पश्चिम रेल्वे सुरू करणार आहे . उत्सव विशेष गाड्यांच्या 30 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. जून 2021 पर्यंत या गाड्या वापरात असणार आहे. वाढीव मागणी लक्षात घेता गाड्यांना जादा बोगी देखिल जोडण्यात येत आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-गोरखपूर, उधना-दानापूर, अहमदाबाद-कोलकाता आणि ओखा-गुवाहाटी स्थानकांदरम्यान आणखी चार अतिरिक्त विशेष विशेष, गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसी मार्फत चालवण्यात येणारी तेजस एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय आरसीटीसीने घेतला आहे.

रुग्णाला घेऊन जात असताना अचानक घेतला रुग्णवाहिकेनं पेट, अमरावतीतील घटना

यामुळे रेल्वे स्थानकांतील गर्दीचे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. रेल्वे प्रशासनाने योग्य ती पावले उचलत स्पेशल गाड्या सुरू केल्या असल्या तरी प्रवाश्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‌अनेक नागरिकांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतून बाहेर पडणाऱ्याची संख्या देखील मोठी आहे.

मागच्या वर्षी लॅाकडाऊनच्या काळात अनेक कामगार, मजुरांनी मिळेल ते साधन पकडत मुंबई सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांनी मैलोनमैल अंतर पायी चालत पार केले होते. यावेळी ती परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी गावी जाणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच पश्चिम रेल्वेकडून समर स्पेशल फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Published by: sachin Salve
First published: April 12, 2021, 11:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या