मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध

यंदा म्हाडाने 25 ते 30 टक्क्यांनी घरांच्या किंमती कमी केल्या आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचं स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 10:03 AM IST

मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, 5 नोव्हेंबर : गेली वर्षभर मुंबईकर ज्याची आतुरतेनं वाट पाहात होते, त्या म्हाडाच्या घरांची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. मुंबईकरांसाठी हे दिवाळी गिफ्ट ठरणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 1300 घरांसाठीची लॉटरी काढली जाणार आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या म्हाडाच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा म्हाडाने 25 ते 30 टक्क्यांनी घरांच्या किंमती कमी केल्या आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचं स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, म्हाडाच्या किमतीही आसमंताला जाऊन भिडल्या असल्यामुळे ही घरं घेणं सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होऊन गेलं होतं. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी बांधून तयार असेली म्हाडाची घरे न विकल्या गेल्यामुळे तशीच पडून होती. म्हाडाची न विकल्या गेलेली 918 घरे औरंगाबादेत, 1150 घरे नाशकात तर 376 घरे नागपुरात आहेत, अशी आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

त्यामुळे म्हाडाच्या घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी म्हाडाचे उदय सामंत यांनी मागच्या महिन्यात एक घोषणा केली. म्हाडाच्या 2441 घरांवर 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे, असं त्यांनी ऑक्टोबरमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं.


Loading...

VIDEO : माकडाने केलं मांजराच्या पिल्लाचं अपहरणबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...