EDच्या चौकशीला निघालेल्या राज ठाकरेंवर अंजली दमानियांनी केली 'ही' खोचक टीका

EDच्या चौकशीला निघालेल्या राज ठाकरेंवर अंजली दमानियांनी केली 'ही' खोचक टीका

राज ठाकरे सहकुटुंब EDच्या चौकशीला निघाले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट- कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीसमोर चौकशी होणार आहे. राज ठाकरे सहकुटुंब EDच्या चौकशीला निघाले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार EDच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असे 'ट्वीट' करून अंजली दमानिया यांनी थट्टा उडवली आहे. बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून ED अधिकाऱ्यांना माहिती देणार का? काय हा drama?का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

अविनाश जाधवांसह या 4 मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची EDसमोर चौकशी होणार आहे. राज ED कार्यालयात पोहोचले आहेत. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

मनसेचे आणखी कोणते पोलिसांच्या ताब्यात?

मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आलं आहे. ही कोणतीही कारवाई नसून खरबरदारी म्हणून उचललेलं पाऊल आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर संतोष धुरी यांना कीर्ती कॉलेज परिसरात पोलिसांकडून नेण्यात आलं आहे.

संदीप देशपांडे ताब्यात...

दरम्यान, आज सकाळीच 'EDiot Hitler' (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 'EDiot Hitler' (इडियट हिटलर)चे टी शर्ट परिधान केलेले अनेक मनसैनिक रस्त्यावर दिसत आहेत.

राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO

First Published: Aug 22, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading