'विवेकी जोडीदारा'साठी अंनिसनं सुरू केलाय व्हाॅट्सअॅप ग्रुप

'विवेकी जोडीदारा'साठी अंनिसनं सुरू केलाय व्हाॅट्सअॅप ग्रुप

स्वत:साठी विवेकी जोडीदार निवडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलाय. त्याच्या माध्यमातून विवेकी जोडीदार निवडण्याचं नवं व्यासपीठच तरुणांना उपलब्ध झालंय.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई, 15 जानेवारी : पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रात लग्नासाठी जोडीदार शोधताना मात्र जात धर्म बघितलं जातं. एवढंच नाही तर कायदेशीर गुन्हा असूनही सर्रास हुंडाही घेतला जातो. या सर्व अविवेकी दलदलीतून बाहेर पडून,  स्वत:साठी विवेकी जोडीदार निवडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलाय. त्याच्या माध्यमातून विवेकी जोडीदार निवडण्याचं नवं व्यासपीठच तरुणांना उपलब्ध झालंय.

अमुक तमुक जाती-धर्माचाच जोडीदार हवा अशी जाहिरात सर्वच ठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे इच्छुक लग्नाळूंना आपापल्या जाती-धर्माची स्थळं मिळतातही. मात्र सुयोग्य विचारांची वर-वधू मिळतातच असं नाही. त्यासाठीच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी 'जोडीदाराची विवेकी निवड' नावाचा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केलाय.

याच व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यामातून सचिन आणि निशाची जोडी जुळली. आणि आता तर ते आपला व्यवसाय सांभाळून इतर लग्नाळूंना मार्गदर्शनही करतात.

आयुष्याचा सुयोग्य जोडीदार निवडणं हिच खरी सर्वात मोठी कसोटी असते..त्यात उत्तीर्ण झालात की कौटुंबिक समस्यांवर देखील नियंत्रण येतं. सुदृढ जीवनासाठी लग्नाळूंना हा उपक्रम म्हणजे सुयोग्य जीवनमार्गच आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 04:14 PM IST

ताज्या बातम्या