...आणि लोकांनी अनिल परबांचा शौचालय उद्घाटनाचा कार्यक्रम बंद पाडला

...आणि लोकांनी अनिल परबांचा शौचालय उद्घाटनाचा कार्यक्रम बंद पाडला

यावेळी शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर ही उपस्थित होते. खार इस्ट परिसरातील तीन बंगला याभागातील एका शौचालयाच्या उद्धाटनाठी अनिल परब गेले होते.

  • Share this:

मुंबई,13 नोव्हेंबर: शिवसेनेचे विधान परिषद गटनेते ऍड. अनिल परब यांचा शौचालय उद्घाटनाचा कार्यक्रम नागरिकांनी बंद पाडला आहे. यावेळी शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर ही उपस्थित होते. खार इस्ट परिसरातील तीन बंगला याभागातील एका शौचालयाच्या उद्धाटनाठी अनिल परब गेले होते.

शौचालय उद्घाटनाला अनिल परब ज्या भागात गेले त्या भागातील नागरिकांनीच अनिल परबांचा कार्यक्रम बंद पाडला.या परिसरात सध्या बीएमसीची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे. या भागात एक पाईपलाईन आहे. पाईपलाईन शेजारील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांचे माहूलला स्थलांतर करण्यात येणार आहे. आता इथे लोकच घरं सोडून जाणार असल्यामुळे या शौचालयांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. घरं असतील तर शौचालयाचा उपयोग आहे. घरंच नसतील तर शौचालय काय कामाचे असं म्हणत नागरिकांनी परबांना घेराव घातला. आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं.

First published: November 13, 2017, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading