07 एप्रिल : होणार...होणार...म्हणत अखेर शिवसेनेनं अखेर पक्षांतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात केलीये. विधानपरिषदेत अनिल परब यांची सेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलीये. विधान परिषदेच्या सभापतींनी घोषणा केलीये. अनिल परबांच्या घोषणेमुळे दिवाकर रावतेंना डच्चू देण्यात आलाय.
शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून फेरबदलाचे वारे वाहत होते. यासाठी मातोश्रीवर जोरदार बैठका झाल्यात. काल गुरुवारी रात्रीही मातोश्रीवर बैठक पार पडली आणि या बैठकीत अनिल परबांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सर्वाधिक आमदार नाराज होते. रावतेंची निवडणुकीत कामगिरीही खराब होती. त्यामुळेच रावतेंच्या जागी अनिल परब यांची वर्णी लागली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा