मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रिसॉर्ट तोडण्यासाठी 'हातोडा' घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर...'

रिसॉर्ट तोडण्यासाठी 'हातोडा' घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर...'

रिसॉर्ट तोडण्यासाठी 'हातोडा' घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर ...'

रिसॉर्ट तोडण्यासाठी 'हातोडा' घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर ...'

Anil Parab on Kirit Somaiya: भाजपचे नेते किरीट सोमय्या हे प्रतिकात्मक हातोडा घेऊन अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टच्या दिशेने निघाले आहेत. रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनीही 149 ची नोटीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती नोटीस स्वीकारण्यास सोमय्यांनी नकार दिला.

पुढे वाचा ...
मुंबई, 26 मार्च : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी थेट रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत थेट दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट आव्हान दिलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का...? किरीट सोमयाय वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, किरीट सोमय्या तोडायला कर्मचारी आहेत का? हिंमत असेल तर तोडून दाखवा. अनिल परब यांनी पुढे म्हटलं, हिंमत असेल तर तोडून दाखवा. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. माझे नाव मुद्दाम घेऊन वातावरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी. किरीट सोमय्या नौटंकी करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू म्हणून. पण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना? असंंही अनिल परब म्हणाले. किरीट सोमय्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न याच दरम्यान दापोलीकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांना कशेडी घाटात पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी यावेळी 149 ची नोटीस देण्याचा प्रयत्न केला मात्र, ही नोटीस स्वीकारण्यास किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खरबरदारी घेत पोलीस प्रशासनाने दापोलीत जमावबंदी लागू करत शहरातील नाक्या नाक्यात बॅरिकेट लावून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
First published:

Tags: Anil parab, Dapoli, Kirit Somaiya

पुढील बातम्या