Home /News /mumbai /

एसटी कर्मचाऱ्यांना तासाभरात मिळणार पगार, अनिल परब यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांना तासाभरात मिळणार पगार, अनिल परब यांची घोषणा

'एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलू नये. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. पण दुःखी होऊन असे कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये'

    मुंबई, 09 नोव्हेंबर : राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.  अखेर महामंडळाकडून तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन आणि दिवाळी अग्रीम रक्कम आज दिली जाणार आहे, अशी घोषणा खुद्द परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी केली आहे. अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महिन्याभराचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 'पुढील तासाभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. उरलेले थकीत वेतन हे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्यासाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे', असंही परब यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या विळख्यात लालपरी, एसटी आगारातील 16 चालकसह वाहक पॉझिटिव्ह 'एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलू नये. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. पण दुःखी होऊन असे कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये. तुमच्या या निर्णयामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येत असते, त्यामुळे कृपया करून असे पाऊल उचलू नका', असं आवाहनही परब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले. यंदा बारामतीत पवार कुटुंबीयांची परंपरा खंडित, घेतला मोठा निर्णय 'एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी  बँकेकडे कर्ज पण मागितले आहे. टप्प्या- टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. राज्य शासनाकडेही पैसे मागितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एसटीसाठी कोणतीही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिला असून काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे', अशी मागणीही परब यांनी केली आहे. जळगावात एसटी कंडक्टरची आत्महत्या कोरोनाच्या काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने एसटी वाहक-चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. एसटी महामंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज चौधरी कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या