मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'सोमय्यांच्या खोटेपणाचा पुरावाच म्हाडाने..' अनिल परब यांचं जाहीर आव्हान; म्हणाले..

'सोमय्यांच्या खोटेपणाचा पुरावाच म्हाडाने..' अनिल परब यांचं जाहीर आव्हान; म्हणाले..

अनिल परब यांचं जाहीर आव्हान; म्हणाले..

अनिल परब यांचं जाहीर आव्हान; म्हणाले..

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना आव्हान दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल परब यांचे कार्यालय फोडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. परब यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना त्यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. सोमय्या यांचे दावे फेटाळून लावत त्यांनी भाजप नेते गरीब मराठी लोकांच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला. म्हाडा संकुलाच्या पुनर्विकासाची तयारी सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे कार्यालय माझं आहे हा जो आरोप किरीट सोमय्या करत होता तो आरोप सपशेल खोटा आहे, असं माजी मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. अनिल परब म्हाडाच्या कार्यालयात गेले होते. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अनिल परब?

म्हाडाने मला लेखी दिलं आहे की या जागेशी माझा कुठलाही संबंध नाही. परिच्छेद क्रमांक एक मध्ये लिहिलं आहे की गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 या दोन इमारतींच्या मधे करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत म्हाडा कार्यालयातील नस्तीचं अवलोकन करता सदर अनधिकृत बांधकामाशी माननीय आमदार अनिल परब यांचा काही संबंध नाही. याचा अर्थ असा आहे की किरीट सोमय्य जे कित्येक वर्षे खोटं बोलत आहेत त्याचा लेखी पुरावाच म्हाडाने दिला आहे. म्हाडा कार्यालयात 27 जून 2019 ला अनिल परब यांच्या नावे जारी केलेली नोटीस आम्ही मागे घेतली आहे. या दोन गोष्टींचा अर्थ हाच आहे की किरीट सोमय्या मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत. म्हाडाने मला लेखी लिहून दिलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या तोंडावर आपटले आहेत.

सोमय्या यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप

मला अशा प्रकारे टार्गेट केल्यानंतर बिल्डरांकडून 'सुपारी' घेणारे सोमय्या नोटिशीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतील, असा दावा परब यांनी केला. पुनर्विकास प्रकल्पात वाढीव जागा (फ्लॅटची) मागणी करण्याविरोधात येथील सोसायटीच्या सदस्यांवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा - कसबा पोटनिवडणूक : काँग्रेसची अंतर्गत डोकेदुखी वाढणार? एका जागेसाठी 16 जणांच्या मुलाखती

सोसायटीतील लोक परब यांच्यासोबत

त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणात सोसायटीतील लोकांनी परब यांना म्हाडाच्या जागेत लोकहितासाठी कार्यालय बनवण्यास सांगितले होते, त्यावर त्यांनी होकार दिल्याचे सांगितले.

सोमय्या यांच्याावर बदनामी केल्याचा आरोप

यासोबतच ते म्हणाले की, भाजप नेते सोमय्या यांच्या खोट्या आरोपांचा उद्देश माझी बदनामी करण्याचा आहे. परब म्हणाले की, मी सोमय्या यांना आव्हान देतो की त्यांनी येऊन पाडलेले कार्यालय पाहावे आणि आरोप सिद्ध करावे. म्हाडाने गेल्या आठवड्यात नियमित करण्यास परवानगी नाकारल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी सोमवारी ही इमारत पाडल्याचे परब यांनी सांगितले.

सोमय्या यांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे नेले होते

विशेष म्हणजे सोमय्या यांनीच सप्टेंबर 2021 मध्ये लोकायुक्तांसमोर हे प्रकरण मांडले होते. यावेळी त्यांनी परब यांच्या बेकायदा कार्यालयाला म्हाडाने विरोध केल्याचा दावा केला होता. मात्र, हा आरोप सोसायटी आणि शिवसेना (यूबीटी) नेत्याने फेटाळून लावला. परब यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर सोमय्या घटनास्थळी पोहोचताच मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे वाहन वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ अडवले.

First published:

Tags: Anil parab, Kirit Somaiya, Shivsena