सिद्धीसाई इमारत दुर्घटना प्रकरणी अनिल मंडलला अटक

सिद्धीसाई इमारत दुर्घटना प्रकरणी अनिल मंडलला अटक

आज विक्रोळीतील सुट्टीकालीन कोर्टात त्याला हजर केलं असता 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये.

  • Share this:

30 जून : घाटकोपर सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणात दुसरा आरोपी गजाआड झालाय. अनिल मंडलला विक्रोळीतील पार्क साईट पोलिसांनी केली अटक केलीय. आज विक्रोळीतील सुट्टीकालीन कोर्टात त्याला  हजर केलं असता 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये.

अनिल मंडल याच्याच देखरेखीखाली हे नुतनीकरणाचं काम सुरू असल्याची पोलिसांची माहिती होती, त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली होती. सिद्धी साई इमारत दुर्घटनेत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता दोन झालीय.

आधी सुनिल शितपला अटक झाली असुन त्यालाही 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. तर मुख्य वास्तुविशारदाचा शोध अद्यापही सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading