राष्ट्रवादीत गेलेल्या या नेत्याने भाजप नेत्यांवर केली अत्यंत खालच्या भाषेत टीका

राष्ट्रवादीत गेलेल्या या नेत्याने भाजप नेत्यांवर केली अत्यंत खालच्या भाषेत टीका

अपमान अथवा अवहेलना सहन करुन भाजपमध्ये राहणारा लाचार मी नाही. मी अहिल्यापूत्र आहे.

  • Share this:

मुंबई,14 डिसेंबर: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यावर खोचक टीका केली आहे. अनिल गोटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून भाजप नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.

'देवेंद्र फडणवीस व गेलेल्या भाजप सरकारविरुद्ध आघाडी उघडल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. देवेंद्रजींच्या वर्षा नाईट क्लबचे सदस्य, भाजपने मला तिकीट दिले नाही, या रागापोटी मी लिहित असल्याचा 'जावई शोध' चाटू लोकांनी लावला आहे. अपमान अथवा अवहेलना सहन करुन भाजपमध्ये राहणारा लाचार मी नाही. मी अहिल्यापूत्र आहे. माझ्या आत्मसन्माला धक्का लागल्या बरोबर मी बाहेर पडलो. आत्मसन्मानाची किंमत लाचारांना कळणार तरी कशी? माझ्या भानगडीत कुणी स्त्री लंपट रामाने कदम टाकू नये. मला संघ जनसंघ निष्ठा वगैरे शिकविण्याच्या नादात पडू नये. देवेंद्रजी आपण पाळलेल्या पाळीव प्राण्यांना वेळीच लगाम घाला. माझ्याकडे गमवण्यासाठी प्राणाशिवाय काही नाही. दिलदार के लिए दिलदार है हम! दुष्मन के लिए तलवार है हम!', असा इशारा अनिल गोटे यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये नाराज असलेले अनिल गोटे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या 80 वा वाढदिवशी अनिल गोटे यांनी भेट घेऊन ते राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा त्यानंतर राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनिल गोटे भाजपविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.

अनिल गोटे यांची फेसबुक पोस्ट...

'तेलगीचा मित्र'

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणे एकेकाळी अनिल गोटे यांचा उल्लेख 'तेलगीचा मित्र' म्हणून केला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र, जुना वाद विसरुन 'शत्रूचा शत्रू मित्र' हे लक्षात घेत अनिल गोटे यांनी आता राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 05:13 PM IST

ताज्या बातम्या