Home /News /mumbai /

अनिल देशमुखांभोवतीचा फास आवळतोय; आता जावयालाही बसली झळ, CBI कडून मोठी कारवाई

अनिल देशमुखांभोवतीचा फास आवळतोय; आता जावयालाही बसली झळ, CBI कडून मोठी कारवाई

CBI ने अनिल देशमुखांच्या जावयाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्याचं माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 1 सप्टेंबर : अनिल देशमुख प्रकरणात त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि एका वकिलाला सीबीआयने वरळी येथून ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर केल्याच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Anil Deshmukhs son in law Gaurav Chaturvedi and a lawyer detained by CBI from Worli ) मिळालेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा या दोघांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. सीबीआयकडून त्यांना कोणत्याही प्रकारचं समन्स सुनावण्यात आलं नव्हतं. वरळीतील सुखदा इमारतीतून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा आपल्या गाडीने जात होते, यावेळी सीबीआयने गाडी रोखून त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. काँग्रेसचे नेेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. अनिल देशमुख क्लिनचिट कागदपत्राबाबत जावयांची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांचे जावई चतुर्वेदी यांना चौकशीनंतर सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anil deshmukh, Mumbai

    पुढील बातम्या