Home /News /mumbai /

मोठी बातमी, अनिल देशमुख राहणार ED कार्यालयात चौकशीसाठी हजर

मोठी बातमी, अनिल देशमुख राहणार ED कार्यालयात चौकशीसाठी हजर

अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक केल्यानंतर ईडीने समन्स बजावला आहे.

मुंबई, 26 जून : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former maharashtra home minister anil deshmukh)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ईडीने (ed) धाडी टाकल्यानंतर आता अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहे. अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक केल्यानंतर ईडीने समन्स बजावला आहे.  चौकशीकरता 11 वाजता हजर राहण्याचे ईडीचे आदेश आहेत. परंतु, ईडीची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख हे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली अशी शक्यता होती. पण, देशमुख यांनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे. ठरल्याप्रमाणे अनिल देशमुख 11 वाजता चौकशीला हजर राहणार आहे. ‘...तर वॉर्नर-मॅक्सवेल T20 वर्ल्ड कपमधून आऊट’, ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा गंभीर इशारा दरम्यान, शुक्रवारी अनिल देशमुख  यांच्या नागपूरच्या निवासस्थानासह मुंबईतल्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी (ED raid) केली. ईडीच्या पथकाने मुंबईत अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे (Kundan Shinde and Sanjeev Palande ) अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, BCCI ची मागणी फेटाळली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पालांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Anil deshmukh

पुढील बातम्या