मुंबई, 30 जून: 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत सापडले आहे. ईडीने (ED) समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीला सहा प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांची चौकशी करायची आहे.
ईडीचा पिडा मागे लागल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेवर विनाकारण त्रास देण्याचा आरोप करत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी ईडीचे वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायालयात सांगितले कि, अनिल देशमुख यांची चौकशी का करायची आहे याबद्दल माहिती दिली.
कोरोना काळात प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात पंतनं लुटला Euro चा आनंद, पाहा PHOTOS
अनिल देशमुख यांच्याकडे असलेली मालमत्ता, नातेवाईकांच्या नावावर असलेली जंगम व स्थापवर मालमत्ता, पाच वर्षांच आयकर परतावा,
नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा सविस्तर तपशील आणि मागील पाच वर्षात जमा झालेले देणगी आणि निधी किती याची चौकशी करायची आहे.
तसंच, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्यामध्ये काय संवाद झाला. आर्थिक व्यवहाराची तपशील काय आहे, याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, अशी भूमिका ईडीने स्पष्ट केली.
ईडीने न्यायालयात माहिती दिल्यानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासाठी वेळ मागितला आहे. खुद्द अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून 7 दिवसांची मुदत मागितली आहे. आपलं वय आणि कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे चौकशीला हजर न राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीच देशमुख यांनी ईडीकडे केली आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली. याबैठकीत अनिल देशमुख यांच्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Maharashtra, Mumbai, Pune