Home /News /mumbai /

ईडीची पिडा टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना, राजकीय नेत्यांच्या भेटीची शक्यता

ईडीची पिडा टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना, राजकीय नेत्यांच्या भेटीची शक्यता

ईडीने (ed) दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर देशमुख यांनी आता दिल्लीकडे धाव घेतली आहे.

  मुंबई, 03 जुलै : 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची धावाधाव सुरूच आहे. ईडीने (ed) दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर देशमुख यांनी आता दिल्लीकडे धाव घेतली आहे. दिल्लीतील वकिलांचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रवाना झाले आहे. तसंच राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती.

  HBD: हासिलला का मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार? तिग्मांशू धुलियानं सांगितलं कारण

  शुक्रवारीच त्यांच्या मुलालाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यामुळे या प्रकरणाबाबत आता कायदेविषयक सल्ला घ्यायला देशमुख दिल्लीला रवाना झाले आहे.  देशमुख अटकपूर्व जामिनासाठी कायदेशीर सल्ला घेणार तसंच काही राजकीय भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख आता सुप्रीम कोर्टात जाणार का याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या (Kundan Shinde and Sanjeev Palande)दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे. दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. ..अन् बायकोनं पतीला धू-धू धुतलं; VIDEOमधील महिलेचा रुद्रावतार पाहून नेटकरी हैराण या दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी ईडीनं पुन्हा एकदा मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीनं न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र आता आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मिडीलमॅन असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. तसंच 4 कोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असंही ईडीनं सांगितलं आहे. आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याच आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझेला ओळखत नाही सांगतात, असं ईडीनं म्हटलं आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Anil deshmukh, Delhi

  पुढील बातम्या