Home /News /mumbai /

Anil Deshmukh चौकशी अहवाल लीक प्रकरण: वकील आनंद डागा यांना CBI कडून अटक

Anil Deshmukh चौकशी अहवाल लीक प्रकरण: वकील आनंद डागा यांना CBI कडून अटक

Anil Deshmukh as lawyer arrested by cbi: अनिल देशमुख यांच्या संदर्भातील चौकशी अहवाल लीक प्रकरणात सीबीआयने कारवाई केली आहे.

मुंबई, 2 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Deshmukh Lawyer Anand Daga) यांना सीबीआयने (CBI) अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात चौकशी अहवालात छेडछाड आणि लीक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी अहवाल प्रकरणात दुसरी अटक सीबीआयचे सब इंस्पेकटर अभिषेक तिवारी यांना अटक केली. अनिल देशमुख यांच्या केस संदर्भात सीबीआयचा अंतर्गत चौकशी अहवाल फुटला होता त्या प्रकरणात सीबीआयने त्यांना रात्री उशिरा अटक केली. सोबतच अभिषेक तिवारी यांचे सीबीआय कार्यालयातील लॉकर आणि अलाहाबाद येथे देखील सीबीआयने तपासणी केली. अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा अहवाल बाहेर कसा आला याचा सीबीआय मागच्या सहा दिवसापासून तपास करत होते. त्यांनतर ही कारवाई झाली. काल सीबीआयने अनिल देशमुख जवाई गौरव चतुर्वेदी यांची देखील विचारपूस केली होती आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर आता सीबीआयने वकील आनंद डागा यांना रात्री अटक केली आहे. राज्यपालांना दिलेल्या 12 आमदारांच्या यादीत बदल? राष्ट्रवादीकडून आणखी एका नावाचा समावेश, कुणाचा पत्ता कट? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी आनंद डागाच्या संपर्कात होता. काही टेलिफोनिक संभाषणाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. आनंद डागा यांचे आणि तिवारी यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. अलाहबाद येथे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे. मुंबई, दिल्ली आणि अलाहबाद येथे रात्री उशीरा पासून सीबीआयचे छापे सुरु आहेत. आनंद डागा यांचा ट्रान्सीट रिमांड घेतला जाणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हा हजर केले जाणार आहे. या प्रकरणी नागपूर येथे धाड पडण्याची शक्यता असून आनंद डागा यांना पैसे कोणी दिले या संबंधी ही धाड असल्याचे बोलले जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil deshmukh, CBI

पुढील बातम्या