मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अनिल देशमुखांच्या अडचणी कमी होईनात, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

अनिल देशमुखांच्या अडचणी कमी होईनात, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. पण आज पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. पण आज पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती. पण आज पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची न्यायलयीन कोठडी (Judicial custody) आज संपणार होती. त्यामुळे त्यांची सुटका होऊन त्यांना दिलासा मिळेल, अशी चर्चा सुरु होती. पण न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये (Arthur road jail) मुक्काव कारावा लागणार आहे. खरंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगाला चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता. पण तरीही मधल्या काळात देशमुख आणि वाझे यांच्या एकाच खोलीतील तासभर भेटीच्या चर्चांना उधाण आलं होतं. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पण अनिल देशमुखांना आता 10 जानेवारीपर्यंत तरी जेलमध्येच राहवं लागणार असल्याचं सध्याचं चित्र आहे.

2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना अटक

100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest) यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार

100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

First published:
top videos