Home /News /mumbai /

अनिल देशमुख आता ईडीच्या जाळ्यात, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख आता ईडीच्या जाळ्यात, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

'केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे.

  मुंबई, 11 मे :  100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडीने (ED) ने गुन्हा दाखल केला आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यांनी व्यक्त केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितले.

  अंधश्रद्धेची बाधा! भूत काढतो म्हणून मांत्रिकाचा दारु पाजत विवाहितेवर अत्याचार

  'केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याच पद्धतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 'हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. ईडीने का दाखल केला गुन्हा? सीबीआय प्राथमिक तपासात देशमुख यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले होते. याच एफआय आरच्या आधारे ED ने गुन्हा दाखल केला असून अनिल देशमुख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात ED ने हा एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास गेला होता. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती.

  आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर

  याच माहितीचा अभ्यास करून प्राथमिक तपास करून ED ने अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती ED सूत्रांनी दिली.  यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करता बोलवणार असल्याची माहिती देखील ED च्या अधिकार्‍यांनी दिली आहे. तत्पूर्वी सीबीआय प्रमाणेच ED देखील काही ठिकाणी छापे मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता ED नेमकी आणि देशमुख यांच्यावर ती काय कारवाई करतं किंवा त्यांची चौकशी कधी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Congress, Nawab malik, नवाब मलिक

  पुढील बातम्या