मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला मिळाला होता iPhone 12 Pro

अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला मिळाला होता iPhone 12 Pro

 अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

अनिल देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलने विजय मिळवला आहे.

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक झाल्याच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

मुंबई, 4 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी करत असतानाच काही दिवसांपूर्वी चौकशी अहवाल लीक (Inquiry Report Leak) झाला आणि देशमुखांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने कारवाई करत सीबीआयच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला अधिकारी हा सीबीआयमध्ये सब इंस्पेक्टर पदावर कार्यरत होता. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

सीबीआयचा अधिकारी अभिषेक तिवारीला (CBI officer Abhishek Tiwari) चौकशी अहवाल लीक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अभिषेक तिवारी याने आयफोनसाठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारी याने आयफोन 12 प्रो लाच (iPhone 12 Pro bribe) म्हणून घेतला होता.

एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी अभिषेक तिवारी हा अनिल देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला गेला होता. या दरम्यान अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांची भेट झाली. या भेटी दरम्यान आनंद डागा यांनी चौकशी अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला आयफोन 12 प्रो दिला होता. जो आता सीबीआयने जप्त केला असून फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे. सीबीआयच्या तपासात असेही समोर आले आहे की, अभिषेक तिवारी नियमितपणे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकीलाकडून लाच घेत होता.

आनंद डागाही अटकेत

अनिल देशमुख यांच्या केस संदर्भात सीबीआयचा अंतर्गत चौकशी अहवाल फुटला होता त्या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. चौकशी अहवालात छेडछाड आणि लीक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआय ने क्लिन चिट दिल्याचा सीबीआयचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे कागद बाहेर कशी आली याचा सीबीआय अधिकारी तपास करत होते. त्यांनतर ही कारवाई झाली.

First published:

Tags: Anil deshmukh, CBI