मुंबई, 4 जुलै : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home minister Anil Deshmukh) यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयापासून संरक्षण मिळविण्यासाठी विविध उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांनाही ED ने समन्स बजावला आहे.
त्यामुळे अनिल देशमुखांच्या मागे ईडीची पिडा लागली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान ईडीचा ससेमीरा संपविण्यासाठी आता अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Anil Deshmukh has filed a petition in the Supreme Court seeking protection from the ED) ईडीकडून तिसरे समन्स बजावण्यात आल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार आपल्याविरोधात सक्तीची कारवाई होऊ नये आणि आपलं संरक्षण व्हावं यासाठी देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी दोन वेळा ईडीने देशमुखांना समन्स बजावलं आहे, त्यावेळी कोरोना, आजारपण या कारणातून ते हा तपास पुढे ढकलत होते. आता तर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हे ही वाचा-मा.राज्यपाल महोदय', राज्यपालांच्या 'त्या' पत्रावर मुख्यमंत्र्यांचं उत्तरऋषिकेश देशमुख अडचणीत?
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
हवाला मार्फत पैशांचा व्यवहार?
एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.