अनिल देशमुखांची 7 तासांपासून सीबीआय चौकशी सुरू, या 30 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं!

अनिल देशमुखांची 7 तासांपासून सीबीआय चौकशी सुरू, या 30 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरं!

आणखी काही तास ही चौकशी सुरू राहणार आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्ह आहे

  • Share this:

मुंबई,14 एप्रिल :  : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Parambir singh) ज्यांच्या लेटर बॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अखेर या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशीला हजर झाले आहे. गेल्या 7 तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरू राहणार आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्ह आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर या शंभर कोटी वसुली प्रकरणाची तक्रार वकील जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची याचिका जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने शंभर कोटी वसुली प्रकरणाची चौकशी लावली आणि ही चौकशी सीबीआयला करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्या अनुषंगाने चौकशी सुरू केली असून आणि देशमुख यांच्या दोन सचिवांची तब्बल 8 तास सीबीआयने चौकशी केली.

‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल

त्यानंतर आज अनिल देशमुख यांची चौकशी काय करणार आहे, साधारणपणे दहाच्या सुमारास अनिल देशमुख हे चौकशी करता सीबीआयच्या डी आर डी ओ या कार्यालय पोहोचले असून त्यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली तर देशमुख यांच्या चौकशी करता सीबीआयने जवळपास 30 ते 40 प्रश्नांची सूची तयार केली असून अनिल देशमुख यांना याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.  त्याबद्दलचे हे संभाव्य प्रश्न...

प्रश्न 1 : आपण परमवीर सिंग यांना कधीपासून ओळखता?

प्रश्न २ : परमवीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी आपण परमवीर सिंग यांना किती वेळ भेटला?

प्रश्न ३ : परमविर सिंग यांनी लिहिलेल्या या पत्राबाबत आपणास काय बोलायचे आहे?

प्रश्न ४ : परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्यावर करण्यात आलेले आरोप यावर आपण काय खुलासा कराल?

प्रश्न ५ : मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना आपण वसुली करण्यास सांगितले होते याबाबत गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे?

प्रश्न ६ : अशाप्रकारे शंभर कोटींची वसुली केली जाते का याबाबत आपल्याला काय माहिती आहे?

प्रश्न ७ : १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश आपण दिले होते का?

प्रश्न ८ : आपल्यावर करण्यात आलेले आरोप आपल्याला मान्य आहेत का?

प्रश्न ९ : आपले दोन्ही खाजगी सचिव यांनी दिलेले हे जबाब आहेत हे आपण वाचून घ्यावेत आणि यांवर आपणास काय आक्षेप आहे का किंवा जबाब आपल्याला मान्य आहेत का?

प्रश्न १० : सचिन वाजे आणि आपली किती वेळा भेट झाली?

प्रश्न ११ : सचिन वाजेला भेटण्यासाठी आपण बोलवलं होतं का सचिन वाजे स्वतःहून तुम्हाला भेटण्या करता आला होता? 

प्रश्न १२ : सचिन वाजे याच्या नियुक्ती करता त्याने तुमची भेट घेतली होती का?

प्रश्न १३ : या भेटीदरम्यान काय चर्चा झाली?

प्रश्न १४ : सचिन वाजे याला पुन्हा पोलिस सेवेत घेण्याकरता आपण त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती का?

प्रश्न १५ : सचिन वाजे याने चौकशी दिलेल्या माहितीनुसार त्याला सेवेत घेण्याकरता आपण काही कोटी रुपयांची मागणी केली होती?

प्रश्न १६ ; सचिन वाजेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आलं याबाबत आपणास काय माहिती आहे ?

प्रश्न १७ : सचिन वाजेला पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यास ही समिती स्थापन करण्यात आली होती त्यापैकी अनेक सदस्यांनी सचिन वाजेला पुन्हा रुजू करून घेण्यास विरोध केला होता तरी देखील सचिन वाजेची पुन्हा पोलीस सेवेत नियुक्ती करण्यात आली याची आपल्याला कल्पना होती का?

प्रश्न १८ : सचिन वाजेला मुंबई पोलीस दलात एपीआय म्हणून म्हणजेच सह पोलीस निरीक्षक म्हणून पुन्हा रुजू करण्यात आलं मात्र त्याला पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती देण्यात आली याबाबत आपल्याला कळवण्यात आलं होतं का किंवा आपल्याला कल्पना होती का? 

प्रश्न १९ : सचिन वाजे हा पोलीस असूनही अनेक आस्थापनांनी कडून पैसे उघडायचा असा आरोप त्याच्यावर करण्यात आले याबाबत आपणास अस काही माहिती होती का?

प्रश्न २० : सचिन वाजे आपल्या खाजगी सचिवांना वारंवार भेटतो फोनवर चर्चा करतो याबाबत आपल्याला काही माहिती आहे का?

प्रश्न २१ : सचिन वाजे याने एसीपी संजय पाटील यांना सांगितल्याप्रमाणे आपण त्याला एक लिस्ट दिली असून त्या लिस्टमध्ये बार हॉटेल रेस्टॉरंट हुक्का पार्लर आणि विविध आस्थापना अशा एकूण सतराशे पन्नास आस्थापना असून त्या आस्थापना कडून वसुली केली जाते अशी विचारणा तुम्ही सचिन वाजे केली होती का किंवा तुमच्या खाजगी सचिवांना करण्यास सांगितली होती का?

प्रश्न २२ : सचिन वाजे हा वरवर तुम्हाला तुमच्या फक्त शासकीय निवास सणावर नाहीतर इतर ठिकाणीदेखील भेटायचा?

प्रश्न २३ : एसीपी संजय पाटील आणि डीसीपी राजू भुजबळ यांना आपण कधी भेटला का भेटला असेल तर किती वेळ आणि कुठे?

प्रश्न २४ : एसीपी संजय पाटील यांनी महाराष्ट्र गृह विभागाला दिलेल्या जबाबानुसार आपल्या खाजगी सचिव आणि त्यांना मुंबई पोलिस दलाकडून केल्या जाणाऱ्या वसुलीबाबत विचारणा केली होती याबाबत आपणास काही कल्पना होती का?

प्रश्न २५ : परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपानुसार संजय पाटील यांची आपण भेट घेत होता?

प्रश्न २६ : आपल्या म्हणण्यानुसार आपण अशाप्रकारे बार रेस्टॉरंट हॉटेल आणि हसत आपणांकडून वसुली केली जाते अशी माहिती आपल्याकडे असतील त्यानुसार आपण डीसीपी संजय पाटील डीसीपी राजू भुजबळ आणि सचिन वाजे यांना विचारणा केली होती तर मग अशी माहिती आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्या प्रकरणाची चौकशी का लावली नाही? 

प्रश्न २७ : जर आपण शंभर कोटी प्रकार विचारणा केली आहे असं आपलं म्हणणं आहे तर मग अशा व्यक्तींवर आपण गृहमंत्री म्हणून का कारवाई केली नाही? 

प्रश्न २८ : शंभर कोटी वसुली बाबत आपणास माहिती होती तर मग याबाबत आपण परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली आहे का किंवा त्यांना काही कारवाईचे आदेश दिले होते का? 

प्रश्न २९ : अशा प्रकारच्या वसुल संदर्भात कारवाई करण्याचे आपण एक तरी आदेश दिले आहेत का?

प्रश्न ३० : तत्कालीन गृहमंत्री म्हणून शंभर कोटी वसुली प्रकरण याचबरोबर परमवीर सिंग यांनी केलेले खुलासे याबाबत आपलं तत्कालीन गृहमंत्री म्हणून काय मत आहे?

Published by: sachin Salve
First published: April 14, 2021, 4:50 PM IST

ताज्या बातम्या