Home /News /mumbai /

वेगळी तारीख द्यावी, अनिल देशमुखांकडून EDला पत्र; वकिलाची माहिती

वेगळी तारीख द्यावी, अनिल देशमुखांकडून EDला पत्र; वकिलाची माहिती

Anil Deshmukh Extortion Case: अनिल देशमुख यांनी ईडी पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत.

  मुंबई, 26 जून: 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former maharashtra home minister anil deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ईडीने (ed) धाडी टाकल्यानंतर आता अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले होते. मात्र सकाळी 11 च्या सुमारास अनिल देशमुख नाहीतर त्याचे वकील जयवंत पाटील ईडी कार्यालयात हजर झाले. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नसून त्यांना नीट रितसर माहिती दिली जावी आणि पुढील वेगळी तारीख द्यावी, अशी मागणी करणारे पत्र वकील जयवंत पाटील यांनी ईडीला दिलं. काय म्हणाले जयवंत पाटील आज देशमुख हे चौकशीला येणार नाहीत.आम्ही वेळ मागितली आहे. देशमुख यांना जे समन्स पाठवलं होतं त्याबद्दल आम्ही ईडी सांगितले आहे की, चौकशीमध्ये आम्हाला कोणत्या बाबतीत प्रश्न विचारले जातील या बद्दल माहिती द्या. काही कागतपत्रं द्या आणि थोडा वेळ द्या. मग देशमुख चौकशीला सामोरे जातील. तसे पत्र आम्ही दिले आहे. हेही वाचा- Breaking News: सचिन वाझेचा जबाबात धक्कादायक खुलासा, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानासह मुंबईतल्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी (ED raid) केली. ईडीच्या पथकाने मुंबईत अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे (Kundan Shinde and Sanjeev Palande ) अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पालांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Anil deshmukh

  पुढील बातम्या