Home /News /mumbai /

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पुन्हा समन्स, मंगळवारी काय होणार?

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पुन्हा समन्स, मंगळवारी काय होणार?

Ed summons Anil Deshmukh for questioning in alleged money laundering case: अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असं दिसत आहे.

मुंबई, 26 जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स (ED summons Anil Deshmukh) बजावले आहे. त्यानुसार आता मंगळवारी अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज बोलावले होते. मात्र, वैद्यकीय कारण देत आज अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावे असे समन्समध्ये सांगण्यात आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे याने दिलेल्या जबाबात खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जी माहिती दिली त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा सुद्धा अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे. ऋषिकेश देशमुख अडचणीत? ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला, जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही. हवाला मार्फत पैशांचा व्यवहार? एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा. ईडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपनी आहेत. या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती. पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण असल्याचे आढळून आले नाही. याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता. यातील चार कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते. या कंपन्यांत मी संचालक होतो याची मला माहिती ही नव्हती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil deshmukh, ED

पुढील बातम्या