Home /News /mumbai /

आर्थर रोड जेलने अडवली अनिल देशमुखांची वाट, आयोगाने व्यक्त केला संशय

आर्थर रोड जेलने अडवली अनिल देशमुखांची वाट, आयोगाने व्यक्त केला संशय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगा समोर हजर न झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगा समोर हजर न झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगा समोर हजर न झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

मुंबई, 13 जानेवारी : 100 कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) चांदिवाल आयोग सुनावणी करता आजही  हजर राहिले नाहीत. त्यामुळे आजही काहीच काम होऊ न शकल्यामुळे आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थर रोड तुरुंग (arthrod jail mumbai) प्रशासनाने देशमुखांना बाहेर सोडण्यास मनाई केली आहे, तर दुसरीकडे तळोजा कारागृहातून सचिन वाझे नियमीत चौकशीला हजर राहत आहे. त्यामुळे आमचा आदेश आर्थर रोड जेल प्रशासन मानत नाही का? असा सवाल चांदिवाल आयोगाने उपस्थितीत केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगा समोर हजर न झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच संजीव पालांडे यांना देखील आर्थर रोड जेलमधून सुनावणीसाठी आणण्यात येते. मात्र त्यांना देखील सुनावणी करता आणण्यात आले नाही. याचे कारण म्हणजे, आर्थर रोड जेलमधील कैदी सुनावणी करता बाहेर जातात, त्यावेळेस त्यांना कोरोनाची लागण होते. हे समोर आलंय. (शरीरावर कमी की काय म्हणून डोळ्यातही टॅटू करायला गेली; मॉडेलची झाली भयानक अवस्था) जर कोरोना आर्थररोड जेलमध्ये वेगाने पसरला तर हाहाःकार होईल. या आधीच क्षमते पेक्षा दुप्पट संख्येने आर्थररोड जेलमध्ये कैदी आहेत. अशातच सध्या कोविडमुळे जेलमधील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी आहे, शिवाय जेलच्या आत कोरोना नियम पाळणे अवघड होत असल्याने जेल बाहेर कैदी गेले नाही तरच योग्य राहिल असं स्पष्टीकरण जेल प्रशासनाकडून देण्यात आलंय. शिवाय कोविडचा धोका पाहता VC म्हणजेच व्हिडिओ काॅन्फर्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी अशी विनंती देखील जेल प्रशासनाने आयोगा केली होती. पण आश्चर्य म्हणजे, चांदिवाल आयोग हा न्यायालयीन चौकशी आयोग असला तरी या आयोगात VC ची सुविधा नाही. यामुळे आरोपी तसंच वकील आणि इतर कर्मचाऱ्यांना सुनावणी दरम्यान व्यक्तीगत हजर राहणे भाग पडते. यामुळे RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्या शिवाय चौकशीला हजर राहता येणार नाही, असे आदेशही मध्यंतरी चांदिवाल आयोगाने दिले होते. (SBI कडून मिळेल विना गॅरंटी 20 लाखांपर्यंत लोन, तुम्ही पात्र आहात का?) दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील चांदिवाल आयोगात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे चांदिवाल आयोगात जोपर्यंत VC ची सुविधा होत नाही तोपर्यंत पुढील सुनावणीस अनिल देशमुख आणि संजीव पालांडे यांना जेल प्रशासन सुनावणी करता पाठवणार नाही का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तर, आयोगाची सुनावणी व्हीसीद्वारे करता येत नाही, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष हजार करावे लागेल त्यासाठी आज त्यांना हजार करावे, असं वाॅरंटही आज आयोगाने काढला होते. मात्र तरीही जेल प्रशासनाने अनिल देशमुख आणि संजीव पालांडे यांना सुनावणीस पाठवले नाही. तर दुसरीकडे तळोजा जेल मधून मात्र सचिन वाझे सुनावणीस हजर होत आहेत. त्यामुळे आर्थर रोड जेल प्रशासन आयोगाचे आदेश मानत नाही का ? या आक्षेप आयोगाने घेतला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या