पंकजा मुंडे आणि दानवेंवर 5 कोटींच्या घोटाळ्याचा 'आप'चा आरोप

पंकजा मुंडे आणि दानवेंवर 5 कोटींच्या घोटाळ्याचा 'आप'चा आरोप

अंगणवाडयांना पुरवण्यात येणाऱ्या सुकडी वाटपची कंत्राट आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय.

  • Share this:

30 मे :  चिक्की घोटाळ्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंगणवाडयांना पुरवण्यात येणाऱ्या सुकडी वाटपची कंत्राट आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय.

या सुकडी वाटप घोटाळ्याची निपक्ष चौकशी होण्यासाठी पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मेनन यांनी केलीय. आपल्या मर्जीतील 18 बचतगटांना काम देण्यासाठी राज्यातील 375 बचतगटांचा बळी दिला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोबतच हे 18 बचतगट बोगस असून पुरुषांचे असल्याचा दावाही त्यांनी केला. यातीलच एक मोरेश्वर बचतगट भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नातेवाईकाचा असून त्यामधून दानवे यांना 5 लाख रुपये चेकद्वारे दिल्याचे पुरावेही मेनन यांनी सादर केले.

First published: May 30, 2017, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading